प्रभाग ५ च्या विकासासाठी अॅड. राहुल गवळी मैदानात!
मिशन-PCMC: अजित गव्हाणे यांचा तळागाळातील कार्यकर्त्यावर विश्वास

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील आगामी निवडणुकीचे बिगुल वाजले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उच्चशिक्षित, अनुभवी आणि जनसंपर्कात अग्रेसर असलेले अॅड. राहुल गवळी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी एका तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्याने प्रभागातील राजकीय समीकरणांमध्ये हालचाल निर्माण झाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
अॅड. राहुल गवळी हे केवळ निवडणुकीपुरते सक्रिय नसून, २०१७ पासून सातत्याने प्रभागातील नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी आहेत. उच्चशिक्षित वकील असतानाही त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याला प्राधान्य दिले आहे. प्रभाग ५ चे स्थानिक रहिवासी असल्याने पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता तसेच इतर नागरी समस्यांची त्यांना सखोल जाण आहे.
सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी अॅड. गवळी यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. २०१७ पासून आधार कार्ड, मतदार कार्ड आदी ऑनलाइन कागदपत्रांसाठी त्यांनी नागरिकांना मोफत मदत केली. महिला सक्षमीकरणासाठी विविध शासकीय योजनांची माहिती देणे, अर्ज भरून घेणे आणि पाठपुरावा करणे ही कामे त्यांनी स्वखर्चाने व सेवाभावी वृत्तीने केली आहेत.
प्रशासकीय कामांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत अॅड. गवळी यांनी प्रभागात विविध उपक्रम राबवले आहेत. यामध्ये मोफत आरोग्य तपासणी व नेत्रदान शिबिरे, रक्तदान मोहिमांचे आयोजन तसेच गरिबांसाठी मदतीचे उपक्रम यांचा समावेश आहे. या सातत्यपूर्ण कार्यामुळे त्यांची ओळख ‘जनतेचा उमेदवार’ आणि ‘कामाचा माणूस’ अशी झाली आहे. प्रभावी वकृत्वशैलीमुळे तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरांत त्यांचे आकर्षण वाढले आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“निवडणुकीत उमेदवारी देताना निष्ठा आणि जनसेवेचा विचार केला जातो. अॅड. राहुल गवळी हे २०१७ पासून प्रभागाच्या विकासासाठी झटणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत. एका सामान्य कुटुंबातील उच्चशिक्षित तरुणाला संधी देऊन आम्ही सामान्यांच्या नेतृत्वाला बळ दिले आहे. प्रभाग ५ च्या सर्वांगीण विकासासाठी ते सक्षम शिलेदार ठरतील,” असा विश्वास शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला.
– अजित गव्हाणे, नेते, राष्ट्रवादी.
“प्रभागाचा कायापालट करणे आणि नागरिकांच्या प्रत्येक समस्यांचे कायमस्वरूपी निवारण करणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून मी जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन.
– अॅड. राहुल गवळी, उमेदवार, राष्ट्रवादी.




