Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

एफएमजीई परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी परीक्षा मंडळाचा निर्णय

मुंबई : परदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांना एफएमजीई परीक्षा देणे बंधनकारक आहे. गतवर्षीच्या दुसऱ्या सत्रातील डिसेंबर २०२५ ची परीक्षा १७ जानेवारी रोजी होत आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी देण्यात आलेल्या अंतिम मुदतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या राष्ट्रीय परीक्षा मंडळाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना ७ जानेवारीपर्यंत कागदपत्रे सादर करता येणार आहेत.

एफएमजीईच्या माहिती पुस्तिकेनुसार विद्यार्थ्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात येते. या प्रक्रियेदरम्यान प्राथमिक वैद्यकीय पात्रता प्राप्त केलेल्या देशातील भारतीय दूतावासाकडून प्रमाणित केलेले प्राथमिक वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र / तात्पुरते उत्तीर्ण प्रमाणपत्राचे प्रमाणीकरण, एनएमसी / एमसीआयकडून जारी केलेले पात्रता प्रमाणपत्र, प्रवेश पत्र, नीट-यूजी पात्रतेचा पुरावा, नागरिकत्वाचा पुरावा, सादर केलेल्या कागदपत्रांतील नाव / जन्मतारीख यामधील विसंगती, एका वैद्यकीय संस्थेतून दुसऱ्या वैद्यकीय संस्थेत स्थलांतरासाठी आवश्यक सहाय्यक कागदपत्रांबाबत त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटींबाबत संबंधित उमेदवारांना एनबीईएमएसकडून ई-मेलद्वारे कळविण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना २ जानेवारीपर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली होती. या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय मंडळाअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय परीक्षा मंडळाने घेतला आहे.

हेही वाचा –  राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ‘‘आरपीआय डेमोक्रॅटिक’’चा पाठिंबा

डिसेंबर २०२५ या सत्राची १७ जानेवारी रोजी एफएमजीई परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पात्र होता व्हावे व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा मंडळाने कागदपत्रे सादर करण्यासाठी ७ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या शिफारशी व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मंजुरीनुसार, केवळ पात्र विद्यार्थ्यांनाच एफएमजीई परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना कागदपत्रे अधिकृत पोर्टलवर सादर करावी लागणार आहेत. कोणत्याही शंकेसाठी एनबीईएमएस कॅंडिडेट केअर सपोर्टशी ०११-४५५९३००० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसच्या कम्युनिकेशन वेब पोर्टलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button