Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्लास्टिकमुक्त पिंपरी चिंचवडसाठी प्रशासन सक्त!

प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर पाच ते पंचवीस हजारांची दंडात्मक कारवाई

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पिंपरी चिंचवड शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, त्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्लास्टिकमुक्त पिंपरी चिंचंवड मोहिमेचा भाग म्हणून आरोग्य विभाग “ह” क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक ३१ मधील नवी सांगवी येथील साई चौक भाजीमार्केट येथे प्लास्टिक बंदी जनजागृती उपक्रम घेण्यात आला. तसेच ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय येथील प्रभाग क्रमांक २९ मधील लक्ष्मीनगर येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपस्थित नागरिकांना झिरो प्लास्टिक, प्लास्टिक फ्री झोन, सिंगल युज प्लास्टिक, प्लास्टिकचे पर्यावरण व मानवी जीवनावर होणारे विपरीत परिणाम, याबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर प्लास्टिक पिशवीचा वापर टाळून कापडी पिशवीचा वापर करावा, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले याशिवाय प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा  :  ‘छावा’ चित्रपटावर बंदी घाला; मौलाना शहाबुद्दीन रझवी यांची मागणी

अशी आहे दंडाची तरतूद

  • बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर पहिल्यांदा केल्यास – ५,००० रुपये
  • बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर दुसऱ्यावेळी केल्यास – १०,००० रुपये
  • बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर तिसऱ्या वेळी केल्यास – २५,००० रुपये व ३ महिने करावास.

जनजागृतीसाठी पथनाट्य सादरीकरण

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून कचरामुक्त, प्लास्टिकमुक्त शहरासाठी विविध ठिकाणी पथनाट्यांचे सादरीकरण देखील करण्यात येत आहे. या पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेबाबत तसेच कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत माहिती दिली जात आहे. तसेच बाजारपेठ तसेच व्यावसायिक ठिकाणी ओला व सुका कचरा विलगीकरण करून तो कचरा महापालिकेच्या घंटागाडीत देण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

सरकारने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे, हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या विक्रेत्याबरोबरच ग्राहकांवर दंडात्मक कारवाई बरोबरच कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये. आपले शहर प्लास्टिकमुक्त होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

– विजयकुमार खोराटे, अतिरिक आयुक्त.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button