पिंपरी-चिंचवडमधील आदिनाथ क्रिकेट क्लब उपांत्यपूर्व फेरीत
पुणे जिल्हा क्रिकेट संघटना आयोजित शिंदे लीग क्रिकेट स्पर्धा
![Adinath Cricket Club in Pimpri-Chinchwad in the quarter-finals](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Adinath-Cricket-Club-Pimpri-Chinchwad-780x470.jpg)
पुणे | पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेचा वतीने आयोजित कै. सदू शिंदे लीग क्रिकेट स्पर्धेत भोसरीतील आदिनाथ क्रिकेट क्लबने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आदिनाथ संघाने सर्वेश भट्टड (१३४ धावा)चे शतकी पारी व नवनाथ वाघमारे (५ गडी) याचा भेदक माऱ्याच्या जोरावर मॉडर्न स्टार संघाचा ८७ धावांनी पराभव करीत उपांत्यपूर्व गाठली.
रॉक २७ स्पोर्ट्स मैदानावर हा सामना पार पडला. नाणेफेक जिंकून प्रथम मॉडर्न संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आदिनाथ संघाने २९. १ षटकात सर्वबाद २७६ धावा जमविल्या. आदिनाथ संघाकडून सर्वेश भट्टड १३४ धावा (८९ चेंडू, २३ चौकार, ३ षटकार) निलेश जाधव ४४ (२७चेंडू,९चौकार,१ षटकार) निखिल जाधव २६ (२०चेंडू,४चौकार,१ षटकार), निलेश जोगदंड २० (८चेंडू,२चौकार,२ षटकार) यांनी धावा काढल्या. मॉडर्न संघाकडून मुनीब बैग ३ गडी,अब्दुल्लाह मोहम्मद यांनी २ गडी बाद केले. ४५ षटकात २७७ धावांचा पाठलाग करतांना आदिनाथ संघाचा भेदक माऱ्यापुढे मॉडर्न संघाचा डाव १८९ धावत आटोपटला. फरहान मोमीण ५५(२९चेंडू,९चौकार,२ षटकार), रोशन कामथ ४७ (३९चेंडू,७चौकार,२ षटकार), अकबर अली खान ३२ (२७चेंडू,५चौकार,१ षटकार) धावा काढीत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु आदिनाथ संघाचा नवनाथ वाघमारे याचा भेदक माऱ्यापुढे ३२ धावात ५ गडी बाद करीत निम्मा संघ तंबूत तंबूत परतला. निलेश जाधव यांनी ३ गडी बाद केले. आदिनाथ संघाने ८७ धावांनी सामना जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. शतकी परी खेळणारा सर्वेश याला सामन्याचा मानकरी घोषित करण्यात आले.
हेही वाचा – ‘संजय राऊतांनी शिवसेना, राष्ट्रवादी संपवली आता..’; काँग्रेसमधील नेत्याचं विधान
संक्षिप्त धावफलक :
आदिनाथ क्रिकेट क्लब २९. १ षटकात सर्वबाद २७६(सर्वेश भट्टड १३४,निलेश जाधव ४४,निखिल जाधव २६, मुनीब बैग ३/६०, अब्दुल्लाह मोहम्मद २/४५,सिराज काझी १/४५)
विजयी विरुद्ध
मॉडर्न स्टार क्रिकेट क्लब २८.३ षटकात सर्वबाद १८९(फरहान मोमीण ५५,रोशन कामथ ४७,अकबर अली खान ३२, नवनाथ वाघमारे ५/३२,निलेश जाधव ३/३०,श्रेयश जगदाळे १/३४)