नाशिक फाटा येथील हुक्का पार्लवर कारवाई, सहाजणांवर गुन्हे दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/68349652.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
हॉटेल निसर्ग येथे खुलेआम सुरू असलेल्या हुक्का पार्लवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली. घटनास्थळी 21 हजारांचा ऐवज मिळून आला आहे. तब्बल सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि. 17) रात्री नाशिक फाटा येथील फुगे कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर ही कारवाई करण्यात आली आहे.
हॉटेल चालक गणेश नामदेव गोडसे (वय 31, रा. भोसरी गावठाण), केतन सुखदेव वाघचौरे (वय 29, रा. सांगवी), शिवम शांताराम खोसे (वय 22, रा. मोशी), राहुल भिमराव लोखंडे (वय 28, रा. थेरगाव), महेश राजेश निकम (वय 23, रा. पिंपरी), नितीन हिरामण गोडसे (वय 45, रा. लांडेवाडी, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस कर्मचारी अनिल महाजन यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश गोडसे याने त्याच्या हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पिण्यासाठी ग्राहकांना एकत्र जमवले. हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्य देखील आरोपी गणेश गोडसे याने पुरवले. हॉटेल निसर्ग हे हॉटेल नितीन गोडसे याचे असून ते चालवण्यासाठी त्याने गणेश गोडसे याला दिले आहे. अन्य आरोपी हॉटेलमध्ये हुक्का पिताना आढळले आहेत. आरोपींच्या ताब्यातून 21 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.