breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवडपुणे

घंटागाडीने वेळ चुकविल्यास चालकावर कारवाई

आरोग्य प्रमुखांचा आदेश : तक्रारींचा निपटारा काढण्याचा प्रयत्न

पिंपरी  । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।  

शहरातील अनेक भागात घंटागाडी वेळेवर पोहचत नाहीत.कधी सकाळी तर, कधी दुपारी येते. या संदर्भात अनेक तक्रारी आहेत. घंटागाडीवर व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि जीपीएस यंत्रणेद्वारे २४ तास नजर ठेवण्यात येणार आहे. नेमलेल्या वस्ती आणि कॉलनीमध्ये वेळेवर घंटागाडी नसल्याचे आढळून आल्यास आरोग्य विभागाकडून चालकांवर कारवाई केली जाणार आहे.

महापालिकेचे सन २००९ मध्ये घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा बसवली होती. त्याचे नियंत्रण केवळ क्षेत्रीय कार्यालयांमधून होत आहे. वाहने कुठे आहेत, कोणत्या गल्लीमधून गेली आहेत, याबाबतची माहिती कर्मचाNयांचे पर्यवेक्षक आणि क्षेत्रीय कार्यालयामध्ये समजत होती.त्यामुळे तक्रारी आल्या तरी त्यांचे निरसन वेळेत होत नव्हते.घंटागाडी वेळेवर येत नसल्याच्या नागरिकांसह लोकप्रतिनिधींच्या वाढत्या आणि नियमित तक्रारी आहेत. त्यासाठी आता सर्व घंटागाड्यांना आरोग्य विभागाच्या वतीने व्हेईकल ट्रॅविंâग सिस्टीम बसवण्यात येणार आहे.त्या माध्यमातून ते वाहन कुठे आहे, याची माहिती मिळते.त्यासाठी आता डॅश बोर्ड विकसित करण्यात येणार आहे.

… तेथे घंटागाडी पाठविणार : ढाकणे

काही भागातून कचरा उचलला नसल्याच्या तक्रारी येतात. तसेच, घंटागाडी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्या तक्रारी सोडविण्यासाठी घंटागाड्यांवर २४ तास नजर ठेवण्यात येणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून एका भागामध्ये किती वेळा घंटागाडी जाते की जातच नाही, याची माहिती उपलब्ध होणार आहे.ज्या भागात घंटागाडी जात नाही, तेथे ती पाठविली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button