तरुणीचा विनयभंग करणा-या आरोपीला जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावाला मारहाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/images-2-7.jpeg)
एका तरुणाने तरुणीचा विनयभंग केला. याचा जाब विचारण्यासाठी तरुणीचा भाऊ गेला असता त्याला आरोपीने मारहाण केली. तसेच तरुणीच्या दुकानाची तोडफोड करून नुकसान केले. ही घंटा बुधवारी (दि. 9) सायंकाळी पावणे सात वाजता डॉ. आंबेडकर वसाहत निगडी येथे घडली.
मनोज वसंत जाधव (वय 25, रा. ओटास्किम, निगडी), डेमन, बिट्टू, कय्युम, सुरज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज याने फिर्यादी तरुणीला ‘तू मला खूप आवडतेस. मी तुला घेऊन जाणार आहे’ असे म्हणून तिचा विनयभंग केला. याबाबत तरुणीच्या भावाने आरोपीला जाब विचारला असता आरोपीने त्याच्या साथीदारांसोबत मिळून फिर्यादी तरुणीच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मनोज याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्या दुकानाची तोडफोड करून दुकानाचे नुकसान केले. पोलिसांनी मनोज जाधव याला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.