घरात घुसून डोळ्यात मिरची पूड टाकत महिलेशी गैरवर्तन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Rape.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
महिलेच्या घरात घुसून तिच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कुटुंबाला मारहाण करत विनयभंग केला. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 5) रात्री एमआयडीसी भोसरी येथे घडली.
हरेश लोहार, मनोज लोहार, रोहित लोहार, आणि नरेश लोहार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 42 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 7) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याचे फिर्यादी यांच्या भावासोबत कंपनीमध्ये भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी महिलेच्या घरी आले. त्यांनी फिर्यादी, त्यांचा भाऊ, मुलगी, वहिनी यांना शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रॉड व कमरेच्या पट्ट्याने ही मारहाण केली. फिर्यादी यांच्या डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून त्यांच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत साकोरे तपास करीत आहेत.