TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
महात्मा फुले मंडई परिसरात तरुणावर वैमनस्यातून तीक्ष्ण शस्त्राने वार
![A young man was stabbed with a sharp weapon out of enmity in Mahatma Phule Mandai area](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/WhatsApp-Image-2022-09-19-at-1.01.19-PM-4-15-2-780x470.jpeg)
निगडी | महात्मा फुले मंडई परिसरात तरुणावर वैमनस्यातून तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली.आशिष मोरे (वय २७, रा. रुपीनगर, निगडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी तिघांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरे याने याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मोरे रात्री पावणेबाराच्या सुमारास महात्मा फुले मंडईतील मिसाळ वाहनतळाजवळ थांबला होता. त्या वेळी तिघांनी त्याच्यावर शस्त्राने वार केले. आरोपी पसार झाले असून मोरे याचा वैमनस्यातून वार करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर तपास करत आहेत.