breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दापोडीत भाजी विक्रेत्या महिलेला महापालिकेच्या महिला सुरक्षा रक्षकांकडून मारहाण

पिंपरी  : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी येथे केलेल्या अतिक्रमण विरोधी करावाईत अनधिकृत भाजी विक्रेत्या महिलेला महिला सुरक्षा रक्षकांकडून मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे महिला सुरक्षा रक्षकांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचे उघड झाले आहे. अशा कर्मचाऱ्यांवर महापालिका प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाणार आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या कासारवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने शुक्रवारी (दि.१४) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दापोडी रेल्वे गेटजवळ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या ताफ्यातील दोन महिला सुरक्षा रक्षकांनी एका महिला भाजी विक्रेती व तिच्या मुलाकडून मारहाण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. यामध्ये विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या अतिक्रमण विरोधी कारवाईत महिला भाजी विक्रतीलाच महिला सुरक्षा रक्षकांकडून मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना पाहता अतिक्रमण विरोधी कारवाईला कोणाचाही विरोध नाही. मात्र, ही कारवाई होत असताना ताफ्यातील महिला सुरक्षा रक्षकांकडून नियम पायदळी तुडवत, महिला विक्रेत्याला मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल उपस्थित झाला आहे.

महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विरोधी पथकात महिला व पुरुष सुरक्षा रक्षकांचा समावेश करण्यात आला असून, त्यांच्या वेतनावर दरमहा लाखो रुपये खर्च केले जात आहेत. तर अनेकदा हे पथक अनधिकृत विक्रेत्यांपासून काही मीटर अंतरावर केवळ बसमध्ये निवांतपणे बसलेले दिसते. अतिक्रमण विरोधी कारवाईत या सुरक्षा रक्षकांच्या आक्षेपार्ह वर्तणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. महापालिका प्रशासनाने या बाबींचा विचार करणे आता गरजेचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button