पीएमआरडीए प्रदर्शन केंद्राच्या जागेत उभा राहणार छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा

पिंपरी : बोर्हाडेवाडी, मोशी येथील पीएमआरडीएच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या (पीआयईसीसी) जागेत छत्रपती संभाजी महाराज यांचा 100 फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्याची जागा बदलण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिकेच्या मंगळवारी (दि.11) झालेल्या विशेष बैठकीत सर्वसाधारण सभेची मंजुरी दिली.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह संबंधित विभागांचे विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने बोर्हाडेवाडी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्यासाठी चौथरा उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर ती जागा योग्य नसल्याने दर्शनी भागात पुतळा उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.
तो पुतळा आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या जागेत उभारला जाणार आहे. त्यासाठी पीएमआरडीएने महापालिकेस 2.5 एकर जागा 21 जुलै 2023 ला दिली आहे. त्यानुसार, त्या जागेत पुतळ्याचे कांस्य धातूचे सुटे भाग तेथे आणून ठेवण्यात आले आहेत. पुतळा दिल्ली येथील कार्यशाळेत तयार करण्यात आला आहे.
हेही वाचा – ट्रोलिंग, माध्यमांवरील वाढत्या दबावाला माध्यम प्रतिनिधींचा विरोध
महापुरूषांचे पुतळे उभारण्यासाठी जिल्हाधिकार्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या नव्या जागेत हा पुतळा उभारण्याचा क क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाच्या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची मान्यता दिली आहे. त्यानंतर जिल्हाधिकार्यांची मान्यता घेऊन पुतळा उभारणीचे काम केले जाणार आहे.
पुतळा उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रदर्शन, संग्रहालय, सुशोभीकरण, उद्यान, प्रकाश व्यवस्था, ध्वजस्तंभ याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र निविदा काढली जाणार आहे.
काम तीन टप्प्यात होणार
– पुतळ्यासाठी आवश्यक चौथर्याचे काम करणे 12 कोटी 47 लाख
– संभाजी महाराजांचा 100 फूट उंचीचा पुतळा उभारणे 32 कोटी 84 लाख
– पुतळा चौथर्याचे उर्वरित काम करणे. परिसर सुशोभिकरण करणे 15 कोटी 11