breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Pimpri-Chinchwad | काळेवाडीत निवासी परिसरातील २ कारखान्याला भीषण आग

पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका निवासी परिसरातील कपड्याच्या कारखान्याला सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. सिलिंडरच्या स्फोटामुळे नंतर ही आग भडकत जाऊन आसपासचे सहा छोटे कारखाने आगीत भस्मसात झाले आहेत.

विजयनगर येथील एका कपड्याच्या कारखान्याला आणि पेपर प्लेट बनवणाऱ्या कारखान्याला सोमवारी भीषण आग लागली. कारखान्याच्या गोदामात सिलेंडर होते. आगीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याचे म्हटले जात आहे. मोठा आवाज झाल्यानंतर आगीच्या ज्वाला भडकल्या तसेच परिसर देखील चांगलाच हादरला.

हेही वाचा     –    एक्झिट पोल्सच्या अंदाजानंतर आज शेअर बाजारात विक्रमी उसळी 

आगीचे लोट उडत असून आजूबाजूच्या परिसरात धूर पसरला होता. त्यामुळे काही लोक परिसरातून लांब गेले. आगीची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाचे सर्व उपविभागातील बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण, आगीत जखमी झालेल्यांची माहिती मिळाली नाही. मात्र आगीमध्ये दोन्ही कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button