स्कूल बसला भरधाव कारची समोरून धडक; दोन विद्यार्थी जखमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-35-3-780x470.jpg)
पिंपरी : बीआरटी मार्गातून जाणाऱ्या स्कूल बसला एका भरधाव कारने समोरून जोरात धडक दिली. या अपघातात स्कूल बस मधील दोन विद्यार्थी जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 29) दुपारी बारा वाजताच्या सुमारास ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे घडली.
हेही वाचा – ‘लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका’; बच्चू कडूंचं विधान
याबाबत माहिती अशी की, पोदार इंटरनॅशनल स्कूल असे नाव असलेली स्कूल बस विद्यार्थी घेऊन ऑटो क्लस्टर चिंचवड येथून जात होती. बस बीआरटी मार्गातून जात होती. त्यावेळी समोरून भरधाव वेगात एक कार आली. कारने स्कूल बसला समोरून जोरात धडक दिली. यामध्ये स्कूल बसचा पुढील भाग चक्काचूर झाला. तसेच कारचेही मोठे नुकसान झाले.
या अपघातात स्कूल बसमधील दोन विद्यार्थी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.