मित्राच्या रिसेप्शनसाठी गेलेल्या व्यक्तीला चौघांकडून मारहाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/images-2-7.jpeg)
पिंपरी l प्रतिनिधी
मित्राच्या रिसेप्शनसाठी हॉटेलमध्ये गेलेल्या एकाला चौघांनी मिळून बेदम मारहाण केली. तसेच त्याचा मोबाईल भिंतीवर मारून फोडला. ही घटना ताथवडे येथे 19 फेब्रुवारी रोजी ताथवडे येथील एका हॉटेलमध्ये घडली.
उमेश शंकरन पिल्ले (वय 33, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी सोमवारी (दि. 21) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डम्नीक स्वामीनाथन आणि त्याचे तीन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिल्ले आणि त्यांचा मित्र अतिश मालवडकर हे दोघेणज त्यांचा मित्र अमित कोरे याच्या लग्नाच्या रिसप्शन कार्यक्रमासाठी 19 फेब्रुवारी रोजी ब्ल्युवॉटर रिसर्ट ताथवडे येथे गेले होते. रात्री जेवण झाल्यानंतर डान्सचा कार्यक्रम असल्याने ते तिथेच थांबले. रात्री 12 वाजताच्या सुमारास फिर्यादी पिल्ले आणि त्यांचा मित्र अतिष हे दोघे लघुशंकेसाठी बाथरुमध्ये गेलो. त्यावेळी तिथे आलेल्या अज्ञात व्यक्तीने “गाली किसको दिया तुने’, असे म्हणाला.
त्यावेळी फिर्यादी यांनी त्यास “मैने तुम्हे गाली नही दी’, असे सांगितले. त्यावेळी आणखी दोनजण तिथे आले. त्यातील एकाने बाथरुम साफ करण्याच्या मबने मारहान करण्यास सुरवात केली. त्यामुळे फिर्यादी पिल्ले यांनी आपला मोबाइल काढुन पोलीसांना फोन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यातील एकाने फिर्यादी यांचा मोबाइल हिसकावून भिंतीस मारुन फोडला. त्यावेळी अमित याचा मेव्हना डम्नीक स्वामीनाथन हा तिथे आला. आम्ही अमित कोरेचे मित्र असल्याचे सांगितल्यावरही त्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.