Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये उपक्रमशील शाळा, गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भव्य सन्मान सोहळा संपन्न

पिंपरी-चिंचवड :  पिंपरी-चिंचवड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) आणि IIB करिअर इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. IIB करिअर इन्स्टिट्यूट, पिंपरी-चिंचवड आणि पुणे यांच्या सौजन्याने मॉर्डन हायस्कूल, यमुनानगर, निगडी, पुणे-४४ येथे हा भव्य सोहळा संपन्न झाला.

या सोहळ्यात पिंपरी, चिंचवड व भोसरी परिसरातील सुमारे 90 हुन अधिक शाळा सहभागी झाल्या असून मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करत प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती

कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. डॉ. श्रीपाल सबनीस (अध्यक्ष, ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) आणि मा. श्री. डॉ. भाऊसाहेब कारेकर (शिक्षणाधिकारी, माध्यमिक, पुणे जिल्हा परिषद) यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी मा. श्रीम. संगीता बांगर (घोडेकर) (प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ, पिं. चिं. मनपा), प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याशिवाय, मा. श्री. प्रसाद गायकवाड (सचिव, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ), मा. श्री. नंदकुमार सागर (अध्यक्ष, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ व सचिव, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघ) हे प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात श्री. संभाजी पडवळ (अध्यक्ष पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ) श्री. सुबोध गलांडे (सचिव, पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघ) आणि यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक मा. ॲड. श्री. महेश लोहारे, (संचालक) व मा. श्री. दैविक मंठाळे (सहसंचालक, IIB करियर इन्स्टिट्यूट, पुणे) हेही उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘मंत्री धनंजय मुंडेंवर आरोपांची मालिका सुरू’; मंत्री आदिती तटकरे

शिक्षकांचे आभार व समाजासाठी त्यांचे योगदान

शिक्षक हा समाज घडवणारा आधारस्तंभ असतो आणि त्यांचे योगदान अपरिमित आहे. त्यांच्या सन्मानाने त्यांच्यात नवीन ऊर्जा संचारेल आणि शिक्षण क्षेत्रात अधिक गुणात्मक सुधारणा घडतील, असा विश्वास डॉ. श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केला. “आज सरकार जे काम करत नाही ते IIB इन्स्टिट्यूट करत आहे”. डॉ श्रीपाल सबनीस सर, “पुढे बोललेवर सरकार सोबत एक पाऊल पुढे टाकत डॉक्टर आणि इंजिनिअर बनवण्याचं समांतर कार्य IIB इन्स्टिट्यूट करत आहे.” त्यानंतर आयोजक मा. ॲड. श्री. महेश लोहारे, (संचालक, IIB करियर इन्स्टिटयूट) ह्यांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

तसेच डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी पुरस्कार वितरण समारंभात शिक्षकांचा गौरव केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व “अशा उपक्रमांमुळे शिक्षकांच्या योगदानाला योग्य तो सन्मान मिळतो आणि शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याला प्रोत्साहन मिळते. IIB करियर इन्स्टिटयूट आणि मुख्याध्यापक संघ त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे निश्चितच कौतुक करावे लागेल, कारण ते समाजात शिक्षकांविषयी आदर वाढवण्यास मदत करते” म्हणत आयोजकांचे कौतुक व आभार व्यक्त केले.

डॉ. श्रीपाल सबनीस सरांचा अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा

कार्यक्रमाची सांगता डॉ. श्रीपाल सबनीस सर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या वर्षानिमित्त त्यांचा वाढदिवस साजरा करून करण्यात आली. उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक परिवारासाठी IIB करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक, ॲड. श्री. महेश लोहार यांनी विशेष स्कॉलरशिप जाहीर केली. या स्कॉलरशिपमुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्वतःच्या शिक्षणात व कौशल्यविकासात अधिक पुढे जाण्यास मदत होईल, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प

या सन्मानाने शिक्षकवर्गात नवी ऊर्जा संचारली असून, भविष्यात अधिक मेहनतीने विद्यार्थ्यांसाठी योगदान देण्याचा संकल्प त्यांनी केला. गुणवंत शिक्षकांचा सन्मान हा शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणारा आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

या सोहळ्याला पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील अनेक शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळा संपल्यानंतर सर्व मान्यवरांनी स्नेहभोजनाचा एकत्रित आनंद घेतला. हा सोहळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी भावना उपस्थित शिक्षक आणि मान्यवरांनी व्यक्त केली.

पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, सहसचिव, खजिनदार, विद्यासचिव, आणि संघांचे सर्व पदाधिकारी यांचे विशेष योगदान लाभले. यांच्या मार्गदर्शननाने आणि पाठिंब्यामुळे हा कार्यक्रम अधिक भव्य आणि संस्मरणीय झाला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button