Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

इस्रायल-लेबनॉन युद्धविराम तीन आठवड्यांनी वाढवला; ट्रम्प यांची घोषणा

Israel Lebanon Ceasefire Extension | इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील सुरू असलेला युद्धविराम तीन आठवड्यांसाठी वाढविण्यात आल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. व्हाईट हाऊसमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या दुसऱ्या फेरीतील चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांनी सांगितले की, इस्रायल आणि लेबनॉनच्या प्रतिनिधींमध्ये झालेली चर्चा सकारात्मक झाली. यापूर्वी दोन्ही देशांमध्ये १० दिवसांसाठी शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. ही मुदत येत्या सोमवारी संपणार होती; मात्र परिस्थिती लक्षात घेता युद्धविरामाला आणखी तीन आठवड्यांची वाढ देण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका मध्यस्थीची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा 

इराणचा पाकिस्तानी सीमेवर हल्ला; दहशतवादी तळ उद्ध्वस्त

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. हिझबोल्लाहपासून लेबनॉनचे संरक्षण करण्यासाठी अमेरिका जवळून काम करेल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू आणि लेबनॉनचे अध्यक्ष जोसेफ आऊन यांच्यात समोरासमोर चर्चेची शक्यता व्यक्त करत या बैठकीचे यजमानपद भूषवण्याची तयारी दर्शवली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button