Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

“भारत भाग्य विधाता”संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे दर्शन

शिक्षण विश्व: स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड: मोशी येथे स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखांचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन “भारत भाग्य विधाता” या संकल्पनेवर अत्यंत उत्साहात पार पडले.

या स्नेहसंमेलनात मंजुरी बाई प्राथमिक विद्यालय आदर्श नगर दिघी, मंजुरी बाई माध्यमिक विद्यालय आदर्श नगर दिघी, गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गंधर्व नगरी मोशी तसेच गायत्री इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चर्होली बुद्रुक या शाखांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे हे स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटले होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विनायक भोंगाळे, प्रमुख पाहुणे वरिष्ठ शास्त्रज्ञ डीआरडीओ पुणे अशोक गोविंद नगरकर , राजमुद्रा अकॅडमी संस्थापक (एमपीएससी यूपीएससी) मनोहर भोले उपस्थित होते. यावेळी संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्या दिवशी स्वागतगीत, गणेशवंदना, नृत्यनाट्य आणि समूहगीत सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.

हेही वाचा –  तरुण नेतृत्व तुषार सहाणे ठरतायेत जनसामान्यांची पसंती!

स्नेहसंमेलनादरम्यान शैक्षणिक, क्रीडा आणि सहशैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. याचवेळी शाळेच्या उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे शिक्षकवर्गामध्ये आनंद आणि प्रेरणा निर्माण झाली.

नृत्य सादरीकरणाला विशेष दाद

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक नृत्य सादरीकरणाला उपस्थितांकडून विशेष दाद मिळाली. टाळ्यांच्या गजरात स्नेहसंमेलनाची सांगता आनंदी वातावरणात झाली. पालकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक करत शाळेच्या उपक्रमांचे अभिनंदन केले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button