किराणा मालाच्या दुकानातून 69 हजारांचा ऐवज चोरीला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/ROBBERY.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
सोमाटणे गावात चौराईनगर येथे एक किराणा मालाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा 69 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आली.
हरजीराम पुनाराम चौधरी (वय 25, रा. चौराईनगर, सोमाटणे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौराईनगर सोमाटणे येथे सिंधू मोहन प्लाझा या सोसायटीत फिर्यादी यांचे किराणा मालाचे दुकान आहे. सोमवारी रात्री त्यांनी दुकान कुलूप लावून बंद केले. सोमवारी रात्री साडेआठ ते मंगळवारी सकाळी सात वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या किराणा दुकानाचे शटर उचकटले. दुकानातून 64 हजार रोख रक्कम आणि पाच हजारांचा एक मोबाईल फोन असा 69 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.