breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात डेंग्यूचे 67 तर झिकाचे 5 रुग्ण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात आत्तापर्यंत 67 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. 8 जणांना चिकुनगुनिया, तर 5 जणांना झिकाची लक्षणे आढळून आली आहेत. यामध्ये 3 गर्भवती महिलांचा समावेश आहे.

डेंग्यू, चिकुनगुनिया आणि झिका नियंत्रणासाठी महापालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय विभागाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डेंग्यू मुक्त शहर अभियान राबविण्यात येत आहे. डासोत्पतीस कारणीभूत ठरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. डासोत्पतीची ठिकाणे नष्ट करून औषध टाकण्यात येत आहे.

हेही वाचा –  ‘वारसास्थळ दत्तक योजना मागे घ्या’; खासदार सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका

शहरात सध्य:स्थितीत 67 जणांना डेंग्यू, 8 जणांना चिकुनगुनिया, तर 5 जणांना झिकाची लक्षणे आढळून आली आहेत. यामध्ये 3 गर्भवती महिलांचा समावेश आहे. या  तीनही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच गर्भवती महिलांना झिका व डेंग्यु या आजाराची ताप, सांधेदुखी, डोळयांच्या मागे दुखणे आदी लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button