Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
67 कोटी 34 लाख खर्चाच्या विषयांना आयत्यावेळी स्थायीची मंजुरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/pcmc-13.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापतींचा एक वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येऊ लागल्याने ऐनवेळच्या विषयाला मंजुरी देण्याचा सपाटा सुरू झाला आहे. आजच्या स्थायी समिती सभेत तब्बल 67 कोटी 34 लाख रुपये खर्चाच्या विषयाला आयत्यावेळी मान्यता देण्यात आली.
स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. मडिगेरी यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यांनी विकास कामांच्या खर्चाला मान्यता देण्याचा धडाका लावला आहे. आज झालेल्या सभेत त्यांनी तब्बल 67 कोटी 34 लाख रुपये खर्चाच्या विषयांना मान्यता दिली. राष्ट्रवादी, शिवेसनेच्या विरोधकांनीही त्यावर आक्षेप न नोंदविता विषयाला मान्यता देताना कसलीही हरकत घेतली नाही. त्यामुळे सर्वकाही खेळीमेळीने आणि समन्वयाने सुरू असल्याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवड महापालिकेत दिसून आला.