Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कंपोस्ट बिन्स खरेदीकरिता 4 हजार लोकांना मिळणार थेट खात्यावर 1400 रुपये अनुदान

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे कंपोस्टींग यंत्रणा उभारण्यासाठी प्रत्येक प्रभागातील 500 असे 8 प्रभागातील 4 हजार नागरिकांना कंपोस्ट बिन्स खरेदीकरिता अनुदान देण्यात येणार आहे. डीबीटी अंतर्गत थेट खात्यावर 1400 रुपये अनुदान वितरित केले जाणार आहे. त्यासाठी येणाऱ्या 56 लाख रुपये खर्चाला आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा काल (बुधवारी) पार पडली. अ‍ॅड. नितीन लांडगे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. विषयपत्रिकेवर 40 विषय होते. त्यातील 32 आणि आयत्यावेळच्या 15 अशा एकूण 47 विषयांना मान्यता दिली. 5 कोटी 24 लाख 83 हजार 499 रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. तर, 5 विषय तहकूब करण्यात आले. तीनविषय फेरसादर करण्याचे निर्देश दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत होम कंपोस्टींगवर भर दिला आहे. घरीच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. ज्यांच्याकडे होम कंपोस्टींग उभारण्यासाठी मोकळी जागा आहे. सदनिकांमध्ये, बैठी घरे, होम कंपोस्टींग करण्यासाठी इच्छुक असलेल्यांना महापालिका अनुदान देणार आहे.

महापालिकेचे आठ प्रभाग आहेत. त्यातील प्रत्येक प्रभागातील 500 नागरिक अशा आठ प्रभागातील 4 हजार नागरिकांना कंपोस्ट बिन्स खरेदीकरिता अनुदान देण्यात येणार आहे. डीबीटी अंतर्गत थेट खात्यावर 1400 रुपये अनुदान वितरित केले जाणार आहे. त्यासाठी येणा-या 56 लाख रुपये खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button