ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
उघड्या दरवाजावाटे 25 हजारांची चोरी
![Interstate gang probes armed robbery at hotel](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/robbery-1.jpg)
पिंपरी चिंचवड | उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी सुमारे 25 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 14) सकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान पुनावळे येथे घडली.दिव्या जालिंदर रानवडे (वय 26, रा. पुनावळे) यांनी मंगळवारी (दि. 14) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान फिर्यादी दिव्या यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून 15 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल व 10 हजार रुपयांची रोकड असा एकूण 25 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.