Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
मावळमध्ये 24 बॅलेट युनिट बदलले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Untitled-design-19-780x470.jpg)
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे. काही ठिकाणी बॅलेट युनिट बदलावे लागले.मावळ लोकसभा मतदारसंघात मॉक पोलचे वेळी 24 बॅलेट युनिट 6 कंट्रोल यूनिट आणि 14 व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. मावळ लोकसभेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीतपणे सुरू असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले.
मावळमध्ये एकूण 9 हजार 236 बॅलेट युनिट आहेत. केंद्रावर एकूण 11 हजार 368 मतदान अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत.