ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सव्वा पाच लाखांचा 21 किलो गांजा जप्त, आरोपी अटकेत

पिंपरी चिंचवड | प्लॅस्टिकच्या पिशवीत सव्वा पाच लाखांचा 21 किलो गांजा घेऊन थांबलेल्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. 90 फुटी रोड, मोशी याठिकाणी भोसरी पोलिसांनी बुधवारी (दि.18) ही कारवाई केली.संजय सदाशिव मोहीते (वय 40, रा. एकता कॉलनी, शास्त्री चौक, भोसरी) असं अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय मोहीते हा 90 फुटी रोड, मोशी याठिकाणी दुचाकीवर प्लॅस्टिकच्या पिशवीत सव्वा पाच लाखांचा 21 किलो गांजा घेऊन थांबला होता. याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार भोसरी पोलिसांनी याठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सव्वा पाच लाखांचा 21 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर परि-०1, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, MIDC भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदिप पाटील, तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस हवालदार शरद गांधिले, पोलीस अंमलदार अनिल जोशी, करन विश्वासे, रहीम शेख, नितिन खेसे, विशाल काळे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button