३ मोबाईल सर्व्हायलेन्स व्हॅन्स पोलिस आयुक्तालयात दाखल
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी तर्फे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडे हस्तांतरण
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड पोलिस दलात ३ मोबाईल सर्व्हायलेन्स व्हॅन्स् (MSV) दाखल झाल्या आहेत. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी तर्फे आयुक्तालय यांना त्याचे हस्तांतर करण्यात आले. अतिरीक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) राजेंद्र सिंग यांच्या हस्ते हा उद्घाटन समारंभ पार पडला. या वेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी होते.
तसेच अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त सुधिर हिरेमठ, उपमहापौर केशव घोळवे, गटनेता सत्तारुढ पक्ष नामदेव ढाके , स्थायी समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे, नगरसेवक सचिन चिखले, संचालक स्मार्ट सिटी, निळकंठ पोमण, सह मुख्य कार्याकारी अधिकारी, विजय बोरुडे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, आदी या वेळी उपस्थित होते.
सदर ३ मोबाईल सर्व्हायलेन्स व्हॅन्स् (MSV) पोलिसांच्या गरजेनुसार बनविले असून त्यामध्ये खालील सुविधा उपलब्ध आहेत. सदरचे वाहन हे अशोक लेलँड यां कंपनीचे उत्पादित असून Mistral, Bangalore या कंपनीमार्फत आवश्यक बदल करुन घेणेत आलेले आहेत, अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा पोलिस दलासाठी उपलब्ध करुन देणेत आलेली आहे. पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी शहरातील पदाधिका-यांचे आभार मानुन सदर वाहनांचा उपयोग शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व वेगवेगळ्या आपतकालिन परिस्थितीमध्ये होईल असे सांगितले आहे.
मोबाईल सर्व्हायलेन्स व्हॅन्स् (MSV) चे वैशिष्ट्य खालील प्रमाणे
१ PTZ कॅमेरा (३६० Degree), ४ व्हेईकल HD कॅमेरा, ८ पोर्टेबल वायरलेस HD कॅमेरा, २ ऑपरेटर, व्हिडिओ मॅनेजमेंट सॉफ्टवेअर १२ कॅमेरासाठी, एसी आणि जनरेटर सेट, १ आठवठ्याची व्हिडोओ साठविण्याची क्षमता, लॅपटॉप, ५५ इंच LED टिव्ही, मिटिंग रुम, वाहनांसाठी LED लाईटस् (१२० Degree), ४ स्पिकर व सायरन, दंगल प्रतिबंधक उपकरणे, युपीएस, स्ट्रेचर, फ्रस्टेड बॉक्स आणि फायर एक्स्टेंग्चर.
पोलिस खात्यासाठी यांचा उपयोग
आषाढी व कार्तिकी वारीसाठी, आळंदी व देहुयात्रेसाठी, मोहरमसाठी, गणेशोत्सवासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी, संप, निवडणुक बंदोबस्त, सार्वजनिक सण, आपतकालिन परिस्थिती, जमाव नियंत्रण.