हाथरस घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, असंघटीत कामगार कॉंग्रेसची मागणी
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
सीबीआय ही यंत्रणा केंद्र सरकारच्या हातातील बाहुले आहे. त्यामुळे सीबीआय हाथरस घटनेचा निपक्षपणे तपास करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात हस्तक्षेप करावा आणि या घटनेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या चौकशी समितीच्या वतीने करावी. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देशातील तमाम महिलांची आहे. न्याय मिळेपर्यंत देशातील कॉंग्रेसच्या सर्व महिला पीडीत कुटूंबियांच्या पाठीशी राहतील असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा शितल कोतवाल यांनी व्यक्त केला.
सोमवारी (दि. 5 ऑक्टोबर) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात हाथरस येथील घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. तसेच पिडीत तरुणीस श्रध्दांजली वाहण्यात आली. या घटनेतील पिडीत कुटूंबियांना भेटण्यासाठी कॉंग्रेसचे सरचिटणीस खासदार राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी गेले असता उत्तर प्रदेश सरकारने त्यांना अटकाव केला. त्याचाही यावेळी निषेध करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, असंघटीत कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, पर्यावरण सेलचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, एनएसयुआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अमर नाणेकर तसेच असंघटीत महिला कामगार कॉंग्रेसच्या वंदना आराख, चंदा ओव्हाळ, संजना कांबळे, परवीन शेख, निलम गवळी, राजश्री वेताळे, शशीकला पोटफोडे, नितीन पटेकर, संजय साळवी, नवनाथ डेंगळे, विजय शिंदे, मोहन उनवणे, संजय कसबे, शिवराज माने, लहू उकरंडे, सुरेश येवले, संकेश ओव्हाळ, वनिता वाघमारे, संदेश नवले, आबा खराडे आदी उपस्थित होते.
शितल कोतवाल म्हणाल्या की, योगी सरकारच्या कार्याकाळात उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. बळी पडलेल्या पिडीत तरुणीचे अंत्यसंस्कार योगी सरकारच्या पोलिसांनी कुटूंबियांच्या परस्पर केले. अशी दुर्दैवी घटना देशात कधीच घडली नाही. महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांबाबत योगी सरकार दुर्लक्ष करीत आहे. हे सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी कोतवाल यांनी केली.