हभप रामहरी कस्पटे आणि उद्योजक अरुण पवार यांचा खासदार बारणेंच्या हस्ते सत्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/IMG-20190605-WA0022.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – तब्बल 36 वर्षे विठ्ठल मंदिरात विणेकरी म्हणून सेवा करणारे हभप रामहरी कस्पटे आणि समाजिक तसेच औद्योगिक क्षेत्रात ख्याती मिळविलेले अरुण पवार यांचा वारकरी सांप्रदायच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रमत रविवारी (दि. 2) पार पडला. कार्यक्रमात हभप ज्ञानेश्वर महाराज (माऊली) कदम यांच्यासह संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष हभप मारुती कोकाटे, समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, मृदुन्गाचार्य पांडुरंग दातार, हभप बाळासाहेब जाधव, हभप वसंत कलाटे, नगरसेवक राहूल कलाटे, मयुर कलाटे, वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.
उद्योजक अरुण पवार हे गेली अनेक वर्षे वारकरी सांप्रदाय सेवेसाठी योगदान देत आले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये पालखी तळावर कीर्तन, भजन, जागर करणा-या वारक-यांना मोफत पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला जातो. पावसाळ्यात सुरक्षीततेसाठी तंबू दिला जातो. भजन साहित्य दिले जाते. तसेच, भंडारा डोंगरावर दोन वर्ष वृक्ष लागवड करून संगोपनाची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली आहे. आजपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात लावलेली रोपे तसेच महापालिकेकडून लावण्यात आलेल्या रोपांना देखील मोफत पाणी पुरवठा केला आहे. त्यांच्या वैयक्तीक कार्यक्रमाचा खर्च टाळून सांप्रदायीक भजनी मंडळ, ज्येष्ठ नागरिकांना रोपे वाटप करण्यावर तसेच भजनी मंडळींना साहित्य भेट देण्यावर खर्च केला जातो.