स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाणाचा भाजप कडून निषेध
![BJP protests against objectionable writings about Swatantryaveer Savarkar Bharatiya Janata Party, Swatantryaveer Savarkar, Congress party's Seva Dal, Mayor Usha alias Mai Dhore, BJP city president and MLA. Mahesh Landage, ex-Kha. Amar Sable, State Secretary Uma Khapre, Union General Secretary Amol Thorat, Standing Committee Chairman Vilas Madigeri, Ruling party leader Eknath Pawar,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/andolan-bjp.jpg)
पुस्तकाचे प्रतिकात्मक दहन; कॉंग्रेस पक्षाच्या सेवा दलाचाही निषेध
पिंपरी । प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण असणाऱ्या पुस्तकाचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. त्याचबरोबर या पुस्तकाचे प्रकाशन करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाच्या सेवा दलाचाही तीव्र निषेध करण्यात आला. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने शहराच्या प्रथम नागरिक महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनीही कॉंग्रेस पक्षाच्या या विकृत मनोवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध केला. या वेळी शहर भाजपाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या पुस्तकाच्या प्रदर्शन व विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा या विरोधातील आंदोलन आणखीनच तीव्र करण्याचा इशारा देखील शहर भाजपाच्या वतीने राज्य सरकारला देण्यात आला.
याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष तथा आ. महेश लांडगे, राज्यसभेचे माजी खा. अमर साबळे, प्रदेश सचिव उमा खापरे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, मा. महापौर आर.एस. कुमार, नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, केशव घोळवे, सुरेश भोईर, माऊली थोरात, बाबू नायर, मा. नगरसेवक राजु दुर्गे, नगरसेविका योगिता नागरगोजे, अनुराधा गोरखे, प्रियांका बारसे, शर्मिला बाबर, वैशाली खाडे यांसोबतच स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे प्रदिप पाटील, भास्कर रिकामे, संजय मंगोडेकर, योगेश चिंचवडे, नंदू भोगले, अजित कुलथे, कृष्णा भंडलकर, हनुमंत लांडगे, संतोष तापकीर, शितल कुंभार, नंदू कदम, शिवदास हांडे, कैलास सानप, आबा कोळेकर, अदित्य कुलकर्णी, प्रा. दत्तात्रय यादव, द्वारकानाथ कुलकर्णी, वीणा सोनवलकर, कोमल काळभोर, सारिका चव्हाण, प्रतीमा बनसोडे आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.