breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना, पोलीस आयुक्त पद्मनाभन यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष आज बुधवारी (दि. 24) सुरू करण्यात आला. जुन्या वाकड पोलीस स्टेशनच्या इमारतीत सुरू केलेल्या वाहतूक नियंत्रण कक्षाचे उद्घाटन पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले आहे. त्यामुळे प्रशासनातील प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे सुरु करण्यासाठी आयुक्तालयाची धावपळ सुरु आहे. पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्षावरच संपूर्ण भार येत आहे. त्यानुसार आयुक्तालयाच्या उद्घाटनानंतर दोन महिन्यानंतर वाकड येथे वाहतूक विभागाचे नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहे.

नियंत्रण कक्षासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 28 ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात घेण्यात आल्या. त्यानुसार नियंत्रण कक्षासाठी मनुष्यबळ कमी पडू नये, असा मानस आयुक्तालयाने ठेवला आहे. त्यानंतर आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता करून वाहतूक शाखा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला. वाहतूक नियंत्रण कक्षासाठी स्वतंत्र नंबर अद्याप सुरू करण्यात आला नसून सध्या मुख्य पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क करूनच वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क करता येणार आहे.

नागरिकांसाठी नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. 020 – 2745 0121, 020 – 2745 0122, 020 – 2745 0666, 020 – 2745 0888, 020 – 2745 8900, 020 – 2745 8901 हे क्रमांक नियंत्रण कक्षाचे आहेत. नागरिकांना तक्रार अथवा सुरक्षाविषयक मदतकार्य हवे असल्यास या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्त पद्मनाभन यांनी केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button