breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायी समिती सभापतीचा ‘मास्टर स्ट्रोक’ ; सुमारे 357 कोटीच्या विकास कामांना मंजुरी

स्थायी सभेत 119 विषयांच्या सुमारे 357 कोटी रुपयाला मान्यता 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना घरे मिळावीत, याकरिता घरकुल प्रकल्पांच्या 84 कोटी 32 लाखासह विविध विकास कामांच्या सुमारे 357 कोटी रुपयाला आज ( शुक्रवारी) स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षात स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांनी तब्बल 119 विषयाला मंजुरी देत विकास कामांचा ‘मास्टर स्ट्रोक’ मारला आहे. 

भोसरीतील गवळीमाथा झोपडपटटी येथील नविन शौचालय बांधणेकामी येणा-या सुमारे ३२ लाख ३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. टेल्को रस्त्यावरील सेच्युरेंका कंपनी जवळील रस्ता करणे साठी येणा-या सुमारे ८२ लाख ६२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

च-होली मोशी येथील विविध ठिकाणचे चरांची व डांबरी रस्त्याची दुरुस्ती करणेकामी येणा-या सुमारे ४१ लाख ७२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. रहाटणी येथील शिवराज नगर, संभाजी गार्डन व परिसरातील रस्त्यांची डांबरीकरण करणेकामी येणा-या सुमारे ३३ लाख ७५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

वायसीएम रुग्णालयामधील नुतणीकरण करणे येणा-या सुमारे ३० कोटी ६६ लाख ७१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. कृष्णानगर, नेवाळेवस्ती, कुदळवाडी व हरगुडेवस्ती परिसरातील भुयारी गटर नलिका टाकणेकामी ५० लाख २७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
भोसरी येथील कै.सखूबाई गबाजी गवळी उदयान येथील लेझर शोसाठी प्रेक्षक गॅलरी व इतर कामे करण्यासाठी रक्कम रूपये ३७ लाख ६५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ साठी जाहिरात करणेकामी येणा-या सुमारे ०९ लाख ३० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरी येथील पिंपरी कॅम्प, मिंलिंद नगर, सुभाष नगर या परिसरातील जननिसारण विषयक कामे करणे करण्यासाठी येणा-या सुमारे ५९ लाख ९९ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महागनरपालिकेच्या परिसरातील अनाधिकृत फलक काढणेकामी ९५ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

अग्नीशमन केंद्रामध्ये व वाहनांवर वायरलेस यंत्रणा उभारणेकामी येणा-या सुमारे ३५ लाख ३६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाच्या शाळेच्या क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी येणा-या सुमारे १२ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
च-हाली येथील चोविसवाडी, वडमुखवाडी रस्ता विकसित करणेकामी येणा-या सुमारे १९ कोटी ४७ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. आर्थीक दुष्टया दुर्बलघटकांसाठी पिंपरी येथील आरक्षण क्र.७७ येथे घरे बांधण्यासाठी येणा-या सुमारे ३१ कोटी ८२ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

आकुर्डी येथील आरक्षण क्रमांक २८३ येथे आर्थीक दुष्टया दुर्बलघटकांसाठी घरे बांधण्यासाठी येणा-या सुमारे ५२ कोटी ५० लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button