Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
सोलापूर, नाशिक, एसटीच्या फेऱ्या रद्द : पुणे विभागाचा निर्णय
![एसटी संपाला हिंसक वळण ; एकाच दिवसांत ३ हजार कर्मचारी निलंबित](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/st-bus-0033_201807113291.jpg)
पुणे – राज्यात ठिकठिकाणी सुरु असलेल्या मराठा मोर्चाने घेतलेल्या हिंसक वळणात एसटीला लक्ष्य केले जात आहे. आंदोलनाच्या कालावधीत प्रत्येक ठिकाणी एसटी बस पेटवण्यात आली तसेच तिची तोडफोड करण्यात आल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला प्रचंड मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. होणारे नुकसान व प्रवाशांची सुरक्षितता या दोन्ही कारणांमुळे पुण्याहून सोलापूर, नाशिक आदी ठिकाणी सुटणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत, अशी माहिती पुणे वि़भाग नियंत्रण कक्षाच्या यामिनी जोशी यांनी दिली आहे. विविध भागात निर्माण झालेली तणाव सदृश परिस्थिती नियंत्रणात आल्यावर या गाडया पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.