breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सासऱ्याला जावयाने दगडाने केली मारहाण

पिंपरी |महाईन्यूज|

चुलत मेव्हण्याच्या घरी पत्नी आणि मुलीसोबत जेवणासाठी गेलेल्या सासऱ्याला जावयाने दगडाने मारले. तसेच, पत्नी व मुलीला शिवीगाळ केली. जावयाच्या विरोधात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (१० ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजता खेड तालुक्यातील चिंबळी फाटा येथे घडली.

बाबू नथू जाधव (वय ५०, रा. राउतवाडी, मावळ) यांनी याबाबत रविवारी (११ ऑक्टोबर) चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्वास किसन चौरे, राहुल शिगाट (दोघे रा. चिंबळी फाटा, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव यांच्या मुलीचा आणि आरोपी विश्वास याचा २०१७ मध्ये विवाह झाला आहे. विवाहानंतर विश्वास हा पत्नीला किरकोळ कारणांवरून मारहाण करीत होता. त्यामुळे त्याची पत्नी माहेरी घरी राहण्यास गेली आहे.

शनिवारी सायंकाळी जाधव, त्यांची पत्नी आणि मुलगी असे तिघेजण आरोपी विश्वास याच्या घराशेजारी राहणाऱ्या चुलत मेव्हण्याकडे जेवणासाठी गेले होते. त्या वेळी आरोपी विश्वास आणि राहुल तिथे आले. त्यांनी सासरे, त्यांची पत्नी आणि मुलगी यांना शिवीगाळ केली. तसेच, दगडाने मारहाण केली. या प्रकरणी चाकण पोलिस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button