breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

साठे विकास महामंडळ उद्योग, व्यावसायाला चालना देणार – पालकमंत्री चंद्रकात पाटील

  • पालकमंत्री यांच्या हस्ते  महामंडळाच्या वतीने लाभार्थ्यांना बीजभांडवलाचे वाटप

पिंपरी ( महा ई न्यूज ) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने आर्थिकदृष्टया मागासलेल्या तरुणांना उद्योग, व्यावसायासाठी चालना देण्यात येत आहे. तरुणांनी चांगला व्यावसाय करून महामंडळाने दिलेले कर्ज मुदतीत फेडावे, असे आवाहन पालकमंत्री, महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा पुणे, सोलापुर  कार्यालयाअंतर्गत  बिजभांडवल, अनुदान योजनेच्या प्रातिनिधिक स्वरूपात  9 लाभार्थ्यांना मंजुर झालेल्या  बिजभांडवल रक्कमेच्या धनादेशांचे वाटप आज (शुक्रवारी) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हस्ते आकुर्डीत वाटप करण्यात आले. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे उपस्थितीत होते.

यावेळी राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अँड. सचिन पटवर्धन, नवनगर प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, आमदार तथा भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, तसेच, महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिलीप खुडे, शिवाजी मांजरे, एन.एम् वाघमारे, एल.ए. क्षिरसागर, जिल्हा व्यवस्थापक महामंडळाचे कर्मचारी, लाभार्थी आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button