breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

साईनाथनगर येथील रस्त्याच्या कामाचा धडाक्यात शुभारंभ

  • ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून कामाला सुरूवात

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधील साईनाथनगर येथील डांबरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. गेली चार वर्षे पाठपुरावा करून प्रभागातील नगरसेवकांनी या कामाला अखेर सुरूवात केली. प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून या कामाला मंगळवारी (दि. 2) प्रत्यक्ष सुरूवात झाली.

महापालिकेने शहरातील बहुतांश प्रभागामध्ये स्थापत्यविषयक रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. परंतु, यमुनानगर येथील या रस्त्याच्या कामासाठी नगरसेवक सचिन चिखले यांनी पाठपुरावा केला. त्यासाठी उत्तम केंदळे, नगरसेविका कमल घोलप, सुमन पवळे यांचे देखील योगदान लाभले. त्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून या कामाला सुरूवात करण्यात आली.

यावेळी नगरसेवक सचिन चिखले म्हणाले की, प्रभागातील अंतर्गत रस्त्यांसह मुख्य रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. पहिल्यांदा मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतर्गत रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. साईनाथनगरमधील रस्त्यासाठी सव्वाकोटीचा निधी मंजूर केला आहे. वाढीव निधी लागलाच तर तो उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. रस्त्याचे काम दर्जेदार करण्यासाठी दोन फुट खोदकाम करून त्यावर डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य लागणार आहे, अशी अपेक्षा चिखले यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button