Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी बरखास्त
![Sambhaji Brigade demands rename of this city as...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/change-punes-name-to-jijapur-sambhaji-brigade_178755.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्यकारिणीच्या सुचनेप्रमाणे तसेच पुणे जिल्हा कोअर कमिटीच्या ठरावानुसार संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी आज शुक्रवारी (दि. २५) बरखास्त करण्यात येत आहे.
संबंधित पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीतील सर्व पदाधिका-यांनी आपआपल्या कुठल्याही स्वरुपात यापुढे वापर करु नये, अशा सूचना प्रदेश कार्यकारिणीकडून देण्यात आल्या आहेत. प्रदेश कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व कार्यकर्त्यांच्या समन्वयातून लवकरच नवनियुक्त शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, जिल्हा सचिव विशाल जरे, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते यांच्या स्वाक्षरी आहेत.