संभाजी ऐवले यांना सहायक आयुक्तपदी नियुक्ती, सामाजिक संस्थांकडून सन्मान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/IMG-20200127-WA0013.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांची दिव्यांग अपंग कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यास सर्वसाधारण सभेने नुकतीच मंजुरी दिली. त्यांची या विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने होलार समाज बहुद्देशीय सामाजिक संस्था पिंपरी-चिंचवड शहर व देहू येथील सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
आकुर्डी येथील विठ्ठलवाडीतील कै. मल्हारराव कुटे अध्यात्मिक व सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतापराव केंगार होते. अध्यक्ष सुभाष जावीर आणि संस्थेचे कायदेशीर सल्लागार प्रतापराव केंगार यांच्या हस्ते संभाजी ऐलले यांचा यथोचीत सत्कार करण्यात आला. त्यावेळी दत्तात्रय पारसे, राजाराम आयवळे, दिलीप गुळीग, विलास हेगडे, सचिन आयवळे, बाबा ढोबळे, श्यामराव गोरवे, दिनकर भंडगे, योगेश आयवळे त्याचप्रमाणे प्रहार क्रांती संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र वाघचौरे, प्रमोद घुले, रामचंद्र तांबे तसेच समाजातील इतर बांधव यावेळी उपस्थित होते.
संभाजी ऐवले स्वच्छ व निष्कलंक अधिकारी
नागरवस्ती विकास योजना विभागाला पालिकेच्या निर्धारित चॅनेलनुसार शैक्षणिक अर्हताधारक अधिकारी मिळत नव्हता. त्यामुळे समाजाच्या विविध घटकातील लोकांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचला नाही. या पदावर शैक्षणिक अर्हता धारण आणि अनुभव कालावधीनुसार संभाजी ऐवले यांचीच वर्णी लागणे क्रमप्राप्त होते. परंतु, या ना त्या कारणावरून त्यांना कायम डावलण्यात आले. तथापि, ऐवले यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. शेवटी पालिका प्रशासनाने त्यांच्यावर सहायक आयुक्त पदाची मोठी जबाबदारी सोपविली आहे. ते यशस्वीपणे पेलू शकतील, यात यत्किंचीतही शंका नसल्याची भावना नागरवस्ती विकास योजना विभागातील कनिष्ठ श्रेणीतील कर्मचारी व्यक्त करत आहेत.