breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संतपीठाच्या वाढीव निविदेच्या निषेधार्थ विविध संघटना आक्रमक

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या संतपीठासाठी वाढीव निविदा मंजूर केल्याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्ष आणि इतर सामाजिक संघटनांच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी (दि. ५) भजन आंदोलन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिका चिखली येथे उभारणा-या संतपीठाच्या कामासाठी मंजूर केलेल्या वाढीव खर्चाच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्ष व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने शनिवारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले. संतपीठाच्या वाढीव खर्चाची मंजूर निविदा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनात मानव कांबळे, हरीश मोरे, नितीन बनसोडे, भालचंद्र फुगे, राहुल पडवळ, छाया देसले आदी सहभागी झाले होते.

या कामासाठीची ४० कोटींची निविदा असताना स्थायी समितीने वाढीव ५ कोटी रुपयांसह एकूण ४५ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली. पाच कोटी हा वाढीव खर्च असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button