संकल्प युवा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर, नागरिकांचा प्रतिसाद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/IMG-20200604-WA0002.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोना महामारी या संकटाच्या पार्श्वभूमीवर कोरोना मुक्त असलेल्या निगडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत सेक्टर नंबर 22 मध्ये संकल्प युवा प्रतिष्ठान या मंडळाच्या माध्यमातून काल दिनांक 1 जून 2020 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 121 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमाचे आयोजन संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रबुद्ध लिंबराज कांबळे यांनी केले होते. विशेष म्हणजे आजपर्यंत या भागामध्ये कोरोनाचा एक पण रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे या कोरोनाच्या लढ्यात आपलेही काही विशेष योगदान असावं या उद्देशाने स्वत: नागरिक या कार्यक्रमाला आले होते. सामाजिक अंतर व स्वच्छतेचे नियम पाळून लहान थोरा सकट महिलांनी ही रक्तदान केले. यामध्ये आपल्याला विशेष सहकार्य लाभलं ते म्हणजे क्रांती सामाजिक विकास संघटना, कामगार संघर्ष संघटना, एस एम बॉईज निगडी, छत्रपती साम्राज्य निगडी, श्री युवा प्रतिष्ठान निगडी, साई प्रतिष्ठाण, स्वाभिमानी युवा प्रतिष्ठान, रोशन युवा प्रतिष्ठाण निगडी, व इतर सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला विशेष सहकार्य केलेले आहे. त्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष प्रबुध्द लिंबराज कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.
नगरसेवक माननीय सचिन चिखले यांनी या कार्यक्रमाला भेट दिली. या वेळेस नियाज खान, कुतबुद्दीन होबळे, गोविंद कुऱ्हाडे, गणेश अवघडे, शिवाजी साळवे, संतोष नाटेकर, श्रीनिवास बिरादार, गणेश वाघमारे, सुजित धोत्रे, रमेश धोत्रे, अंजार अन्सारी, राजु खाडे, राकेश बाराथे, अक्षय भापकर, रमेश गायकवाड, संकेत अंकाली, निलेश साळुंखे, प्रीतम बनसोडे, आकाश डोंबे, सतिष कोळी, अंकुश कानवडे, चवडाप्पा तळवार, अमीर पटेल, मुकेश सोनकांबळे, मोनिकेश चांदे, मोनू पवार आदी उपस्थित होते.