breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवरायांनी दिलेला एकतेचा वारसा नव्या पिढीने जतन केला पाहिजे – महापौर माई ढोरे

पिंपरी / महाईन्यूज

शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्र करुन स्वराज्याची निर्मिती केली. त्यांनी दिलेला एकतेचा वारसा नव्या पिढीने जतन केला पाहिजे, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रारंभी मुख्य प्रशासकीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापौर माई ढोरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्यानंतर त्यांनी शहरवासियांना शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर केशव घोळवे, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, मुख्य उद्यान अधिक्षक प्रकाश गायकवाड, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, मुख्य लिपिक प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते प्रतिक पवार, विक्रांत पवार, युवराज दाखले, सचिन लिमकर, राहूल शिर्के, काका कुलकर्णी आदी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे यांनी आपल्या भाषणात शिवराय सर्वांसाठी प्रेरणा शक्ती आणि स्फूर्ती देणारे उर्जास्त्रोत आहेत. संकटांचे संधीत रुपांतर करुन त्यांनी शत्रूवर मात केली. त्यांचा आदर्श घेतला पाहिजे असे सांगून सध्या कोरोना महामारीचे सावट असुन सर्वांनी मास्क परिधान करुन, गर्दी टाळून आणि सुरक्षिततेचे नियम पाळावेत असेही त्या म्हणाल्या.

महानगरपालिकेच्या वतीने महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी एच . ए. कॉलनी पिंपरी, लांडेवाडी चौक भोसरी, भक्ती शक्ती चौक निगडी, डांगे चौक थेरगाव आणि थेरगाव गावठाण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

एच . ए. कॉलनी पिंपरी, येथील कार्यक्रमास विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुजाता पालांडे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी नगरसदस्य महंमदभाई पानसरे, कैलास कदम, अरुण बोऱ्हाडे, सहा. आरोग्याधिकारी रमेश भोसले, शिवस्मारक समिती प्रतिष्ठानचे  सुरेंद्र पासलकर, सर्जेराव जुनवणे, संतोष ढोरे आदी उपस्थित होते.

लांडेवाडी चौक भोसरी, येथील कार्यक्रमास स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, मुख्य लिपिक प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

भक्ती शक्ती चौक निगडी, येथील कार्यक्रमास विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे , अनुराधा गोरखे, नगरसदस्य अमित गावडे, मुख्य लिपिक प्रफुल्ल पुराणिक, शिवजयंती उत्सव समितीचे सागर तापकीर,जीवन बोऱ्हाडे, अभिषेक म्हस्के, नकुल भोईर, दादा पाटील, राजू पवार आदी उपस्थित होते.

डांगे चौक थेरगाव, येथील कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, प्रभाग अधिकारी श्रीनिवास दांगट, प्रशासन अधिकारी राजेश ठाकर, सहा. आरोग्याधिकारी  संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.थेरगाव गावठाण येथील कार्यक्रमास प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, स्वीकृत प्रभाग समिती सदस्य विनोद तापकीर, गोपाळ माळेकर,प्रभाग अधिकारी श्रीनिवास दांगट, प्रशासन अधिकारी राजेश ठाकर, सहा. आरोग्याधिकारी  संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

तसेच उपमहापौर केशव घोळवे यांनी महापालिकेच्या वतीने  कासारवाडी, दापोडी, पिंपरी वाघेरे, रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. कासारवाडी येथील कार्यक्रमास माजी खासदार अमर साबळे, नगरसदस्य शाम लांडे, माऊली थोरात, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जवळकर, कुणाल लांडगे, सुनिल लांडगे, मामा पडवळ, शिल्पा दांडेकर, देवदत्त लांडे, संतोष टोणगे, मनोज बोरसे  आदी उपस्थित होते. दापोडी येथील कार्यक्रमास नगरसदस्य राजू बनसोडे, माऊली थोरात,  नगरसदस्या माई काटे, आशा धायगुडे, माजी नगरसदस्या चंद्रकांता सोनकांबळे, रेल्वे समिती सदस्य विशाल वाळुंजकर, सामाजिक कार्यकर्ते सिकंदर सुर्यवंशी, नवनाथ डांगे, गणेश आडले, कुणाल सोनीगरा, सत्यवान काटे, गणेश काटे, शेखर काटे, अलका काटे, आशा काटे, जयवंत मोरे, दत्तात्रय वाळुंजकर आदी उपस्थित होते. पिंपरी वाघेरे येथील कार्यक्रमास नगरसदस्य संदीप वाघेरे, माऊली थोरात, सामाजिक कार्यकर्ते संदीप गव्हाणे आदी उपस्थित होते. तर रहाटणी येथील कार्यक्रमास ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसदस्य चंद्रकांत नखाते, माऊली थोरात, नगरसदस्या सविता खुळे, स्वीकृत प्रभाग समिती सदस्य विनोद तापकीर, गोपाळ माळेकर, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट आदी उपस्थित होते.

स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी महानगरपालिकेच्या वतीने पी. एम. टी. चौक भोसरी, येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तर मोशी येथील पुतळ्यास नगरसदस्य वसंत बोराटे, लक्ष्मण सस्ते यांनी महानगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी महानगरपालिकेच्या वतीने प्रेमलोक पार्क तसेच मोहननगर चिंचवड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण केला यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुनिल पिंजण, उपलेखापाल सोमनाथ साबळे आदी उपस्थित होते.

दरम्यान महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दोन दिवसाच्या ऑनलाईन विचार प्रबोधन पर्वाचे महापौर उषा उर्फ  माई ढोरे यांनी काल उद्घाटन केले. काल झालेल्या कार्यक्रमात ख्यातनाम वक्ते शेखर पाटील यांनी “ शिवचरित्र आणि आजची युवा पिढी” या विषयावर व्याख्यान सादर केले. या कार्यक्रमानंतर सुप्रसिद्ध शाहिर प्रसाद विभुते यांनी छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. त्यांनी त्यांच्या पोवाड्यातून प्रतापगडाचा पराक्रम, महाराजांची रणनिती, युद्धकौशल्य व राजनिती आणि प्रतापगडाचा पराक्रम सादर केला.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button