breaking-newsपिंपरी / चिंचवड

शाळेत घुसून शिक्षकांना शिवीगाळ; गुन्हा दाखल

पिंपरी:- शाळेतील माजी शिक्षकाने शाळेत घुसून मुख्याध्यापिका, शिक्षक आणि स्टाफला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार (दि.१) सायंकाळी पाचच्या सुमारास भोसरी आदीनाथनगर येथील हिंदी माध्यमिक विद्यालयात घडली.

याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिला शरद कांदेकर (वय ४७, रा. ए ४, गणेश साम्राज्य इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शाळेतील माजी शिक्षक संजय तिवारी (वय ४२, रा. रागा फेम, फ्लॅट क३. ६०१, नेवाडेवस्ती, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी मुख्याध्यापिका शर्मिला या शाळेत मुलांना शिकवत असताना आरोपी शिक्षक संजय हे शाळेत घुसले. तसेच मुख्याध्यापिका शर्मिला आणि स्टाफला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी संजय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते सध्या फरार असून भोसरी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button