शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नरेंद्र बनसोडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/yuvak-congress.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी नरेंद्र बनसोडे हे विजयी झाले आहे. तर चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी संदेश बोर्डे यांची तर मयुर जैयस्वाल यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड कऱण्यात आली. नुकत्याच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुका झाल्या असून त्याची मतमोजणी व अंतिम निकाल नागपूर येथे जाहीर करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणीवर उपाध्यक्ष शशीकांत शिंदे, करण गील, अनिकेत अरकडे, कुंदन कसबे, डॉ. स्नेहस खोब्रागडे, विरेंद्र गायकवाड, रौनक तावडे, इब्राहिम चौधरी, गौरव चौधरी यांची सरचिटणीसपदी तर चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी सौरभ शिंदे यांची निवड झाली.
या विजयाबद्दल बोलताना नरेंद्र बनसोडे म्हणाले की, या पुढील काळात युवकांच्या समस्या मुख्यत्वे बेरोजगारी तसेच इतरही सामाजिक प्रश्न सोडवून त्यांना सक्षम करणार असून शहरामध्ये समतावादी युवकांचे संघटन युवक काँग्रेसच्या माध्यमांतून करणार आहे. लवकरच युवा जो़डो अभियान राबविणार असून युवा वर्ग युवक कॉंग्रेसची जोडून कॉंग्रेस संघटना बळकट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.