Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहर भाजपला दणका, आझम पानसरे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर

  • माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती
  • पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांची घेतली बैठक

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका 2017 च्या निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केलेले माजी महापौर आझम पानसरे आज राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथमच पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन आज आकुर्डी येथील एका हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत पानसरे यांनी हजेरी लावली होती.  

आझम पानसरे हे पिंपरी-चिंचवड शहरातील वजनदार नेते म्हणून परिचित आहेत. शहरातील राजकारणात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पानसरे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अंत्यत निकटवर्तीय म्हणून देखील ओळखले जात होते. राष्ट्रवादीकडून महापौर, स्थायी सभापती, शहराध्यक्ष अशी महत्वाची पदे भूषविली आहेत. लोकसभेची निवडणूक देखील त्यांनी राष्ट्रवादीकडून लढविली होती. मात्र, २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.

त्यांच्या भाजपातील प्रवेशामुळे राष्ट्रवादीला निवडणुकीत मोठा फटका बसला होता. मात्र, महापालिकेत सत्ता मिळवून दिल्यानंतर देखील भाजपाने पानसरे यांचे राजकीय पुनर्वसन केले नाही. ही खंत पानसरे यांच्या मनामध्ये कायम आहे. भाजपावरील त्यांची सुप्त नाराजी प्रकर्षाने जानवत होती.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जाहिर पाठींबा देखील दिला होता. मात्र, अधिकृतपणे त्यांनी भाजप सोडल्याचे जाहीर केले नव्हते. आज पानसरे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत दाखल होऊन व्यासपीठावर हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे सर्वांनाच सुख:द धक्का बसला असून येत्या काळात ते राष्ट्रवादीत सक्रिय होतील, असे बोलले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button