breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहर भाजपला गळती, खडसे समर्थक ‘ओबीसी’ महिला अध्यक्षांचा राजीनामा

पिंपरी / महाईन्यूज

नुकतेच भाजपतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांच्या कट्टर समर्थक व पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा ओबीसी महिला मोर्चा अध्यक्षा सारिका पवार यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व अध्यक्ष पदाचा आज राजीनामा दिला. शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्याकडे राजीनामा सूपूर्त केला. या राजीनाम्यामुळे भाजपातील नाराज खडसे गटाला रोखण्याचे आव्हान आमदार महेश लांडगे यांच्यासमोर निर्माण झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाची सत्ता नसताना पक्ष संघटनेत पवार यांनी भाजपा सदस्य नोंदणी, विविध आंदोलने केली, आरोग्य शिबिरे घेतली, महिलांसाठी विविध प्रशिक्षणे राबविली, महिलांना स्वावलंबी होण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. पक्ष संघटन वाढविण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. परंतु, त्यांच्यावर खडसे गटाचा शिक्का बसल्यामुळे स्थानिक भाजपाने पवार यांच्यावर २०१७ च्या महापालिका निवडणुकीत अन्याय केला. या निवडणुकीत पक्षाने त्यांची उमेदवारी कापून त्यांना कायम दुर्लक्षीत ठेवले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर सत्ता आल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली नाही. ”नाथाभाऊ माझे नेते आहेत, त्यांचा संघर्ष माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या सन्मानार्थ मी राजीनामा देत” असल्याची परखड प्रतिक्रिया देत त्यांनी आपल्या पदाचा आणि भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पवार यांच्या राजीनाम्याने खडसे समर्थकांची भाजपला आता गळती लागण्याचे संकेत मिळत आहे. ही गळती रोखण्याचे शहराध्यक्ष तथा आमदार लांडगे यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button