Breaking-newsपिंपरी / चिंचवड
शहरातील 125 जणांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/3PunePolice-1.jpeg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई हळूहळू वाढू लागली आहे. शुक्रवारी (दि. 2) पोलिसांनी 125 जणांवर कारवाई केली आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याने पोलिसांनी विनामास्क घराबाहेर पडणा-या व्यक्तींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन करणा-यांवर देखील कारवाई केली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/पोलीस-1024x863.jpg)