breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वीजवाहक तार लागल्याने वायरमनला मारहाण

पिंपरी – रस्त्याने जात असताना वीजवाहक तार लागल्याच्या कारणावरुन वायरमनला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना हिंजवडी-माण रोडवर गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

साहेबराव कुंडलिक ओझरकर, महेश साहेबराव ओझरकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नानासाहेब पंडीत जेवे (वय ३९, रा. मथुरा कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिंजवडी-माण रोेडवर जेवे व त्यांचे सहकारी वरिष्ठ वायरमन नथू पवळे व तानाजी काकनाळे हे वीजविषयक कामे करीत होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन आले असता जेवे यांनी सांगितले की, ‘वीजेच्या तारा ओढण्याचे काम सुरु आहे. पुढे जावू नका’. तरीही आरोपी पुढे गेले असता विजेच्या तारा त्यांना लागल्या. विजेच्या तारा लागल्याच्या कारणावरुन आरोपींनी जेवे व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. दरम्यान, पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button