विशेष मदत कक्षाद्वारे सुटणार उच्चदाब वीज ग्राहकांचे प्रश्न
पुणे प्रादेशिक कार्यालयात सोय
पुणे | प्रतिनधी
प्रामुख्याने औद्योगिक ग्राहकांसह सर्व उच्चदाब वीज ग्राहकांसाठी वीज सेवेबाबत सर्व प्रकारच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुणे प्रादेशिक कार्यालयात विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. या मदत कक्षाकडे [email protected] या इमेलद्वारे उच्चदाब वीजग्राहकांना संपर्क साधता येईल व तक्रारी दाखल करता येतील, असे आवाहन महावितरणच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील औद्योगिकसह सर्व उच्चदाब वीज ग्राहकांच्या वीजपुरवठा, वीजबील, नवीन वीज जोडणी, वीजभार बदल आदींबाबतच्या तक्रारींची त्वरीत दखल घेऊन त्याचे निराकरण करण्यात येणार आहे. पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे हे प्राप्त झालेल्या तक्रारीं व त्याचे निराकरण याबाबत नियमित आढावा घेणार आहेत. उच्चदाब वीजग्राहकांनी वीजसेवा, बिलिंगबाबत तक्रारी असल्यास [email protected] या इमेलवर पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
……………………….