विशालनगरमध्ये मागतकरी महिलांचा नागरिकांना त्रास, नगरसेवक तुषार कामठे यांनी दिली सक्त ताकीद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/IMG-20200526-WA0012.jpg)
पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपळे निलख येथील विशालनगर भागात काही महिलांकडून नागरिकांना त्रास दिला जात आहे. किराणा माल घरी घेऊन जाताना या महिला तरुणांची अडवणूक करुन माल हिसकावून घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलांना योग्य समज देऊन असा प्रकार परत घडता कामा नये, अशी ताकीद नगरसेवक तुषार कामठे यांनी संबंधित महिलांना दिली आहे.
विशालनगर पिंपळे नीलख येथे जवळ जवळ सर्व रस्त्यावर असलेल्या किराणा मालाची दुकाने, किंवा भाजीपाला फळ विक्रेते ह्यांच्या आजूबाजूला काही स्त्रिया उभ्या असतात. त्यांच्या पेहराववरुण त्या सदन कुटुंबातील वाटतात. परंतु, त्या महाराष्ट्रीयन नाहीत. वस्तुंची खरेदी करून माणूस बाहेर पडला की त्या स्त्रिया त्यास घेरतात. अगदी अंगावर येऊन पैसे मागतात. तर कधी माणसाच्या हातातील पिशवी ओढण्याचा प्रयत्न करतात. अन किमान पैसे घेतल्याशिवाय त्यास सोडत नाही. असा प्रकार घडला आहे, असे कामठे यांनी सांगितले.
शेवटी माणूस सुटकेसाठी पैसे देऊन निश्वास टाकतो. एका मित्राने जवळ जवळ सातशे रुपयाची केलेली खरेदी पिशवीत होती. अन त्यास पाच ते सहा स्त्रियांनी घेरून पैसे दिले नाहीत म्हणुन पिशवी हिसकावून घेतली. अशा स्त्रियांचा वावर जवळजवळ विशालनगरमधील सर्वच रस्त्यावर दिसून येत आहे. सध्याच्या काळात आपन corontine मुळे सोशल distance पाळत असून घरातील केवळ एकच माणूस खरेदीसाठी जात बाहेर पडत आहे. अशा एकटेपणाचा ह्या स्त्रिया दबाव टाकून फायदा घेत आहेत. तरी नागरिकांनी सतर्कता बाळगावी. सध्या पोलिस बंदोबस्तात गुंतले असल्याने नागरिकांनी स्वताची काळजी स्वतः घेणे आवश्यक आहे, अशी सूचना कामठे यांनी केली आहे.