विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा कार्यकाळ संपुष्टात, राष्ट्रवादीने मागविले इच्छुकांचे अर्ज
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा पदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी पक्षाच्या इच्छुक नगरसेवकांचे अर्ज मागविले आहेत.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते काटे यांचा कार्यकाळ नुकताच संपत आहे. त्यामुळे 2020-21 या वर्षात विरोधी पक्षनेते पदाचा लाभ अन्य इच्छुकांना मिळणार आहे. यासंबंधीत तातडीने इच्छुकांचे अर्ज मागवून घेऊन निवड प्रक्रिया राबवावी, असे आदेश राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांना दिले आहेत.
त्यानुसार वाघेरे पाटील यांनी पक्षाच्या नगरसेवकांना अर्ज करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोमवार ते बुधवार (दि. 12) दरम्यान खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. छानणी करून सक्षम नगरसेवकाची या पदावर निवड केली जाणार आहे, अशी माहिती वाघेरे पाटील यांनी कळविली आहे.