Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
विधानसभा निवडणूक : राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांची पिंपरीमध्ये मोर्चेबांधणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Parth.jpg)
– बूथ यंत्रणा सक्षमीकरणासह कार्यकर्ते-पदाधिका-यांची बैठक
पिंपरी। प्रतिनिधी ।
आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मावळ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून राजकीय मैदानात उतलेले युवा नेते पार्थ अजित पवार यांनी आता बूथ यंत्रणा सक्षम करण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातून लोकसभेत मोठ्या मताधिक्याने पिछाडीवर राहिले असतानाही खचून न जाता पार्थ पवार यांनी जोमाने कामाला सुरूवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे बूथ कमिटी आढावा बैठक आकुर्डी येथे महाराष्ट्र पार्थ पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी नगरसेवक राजू भाऊ मिसाळ, नंदा ताकवणे, विजय लोखंडे, विशाल वाकडकर, विशाल काळभोर, फजल शेख आदी उपस्थित होते.