विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी ‘बीआरएसपी’चे तहसीलदारांना निवेदन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/IMG-20191213-WA0100.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
राज्यातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने आकुर्डीतील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बेरोजगारी हटविण्यासाठी नोकर भरती घेण्यात यावी. माहपोर्टल बंद करण्यात यावे. स्पर्धा परिक्षा घेऊन नोकर भरती करावी. वर्ग क आणि डची प्रथम मैदानी चाचणी घ्यावी. पोलीस भरतीसाठी येणा-या उमेदवारांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात यावी. महागाई विचारात घेऊन शिष्यवृत्ती वाढवण्यात यावी. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवून मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणाचा तत्काळ लाभ देण्यात यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार गीता प्रकाश गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.